चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

देवळी येथील खुनाचे गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

आरोपीतांनी संगणमत करुन पैशाच्या मोबदल्यात सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. १२/१०/२०२१ रोजी फिर्यादी गजानन बापुरावजी खोंड, रा. सावंगी (मेघे) वर्धा यांनी पोलीस स्टेशन देवळी येथे येवुन रिपोर्ट दिला कि, त्यांचे नातेवाईक मृतक वसंत भाऊराव ढोणे, वय ६० वर्ष, रा. देवळी हे गुरुकृपा लॉन देवळी येथे चौकीदार म्हणुन कामाला होता. दि. ११/१०/२०२१ ते दि. १२/१०/२०२१ चे रात्रदरम्यान यातील मृतक हा त्याचे कामावर असतांना कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी शस्त्राने जिवानीशी मारुन खुन केला. अशा फिर्यादीचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन देवळी येथे नमुद गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याची माहीती प्राप्त होताच घटनास्थळी मा. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी पुलगाव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी भेट देवुन तपास करण्यास सुरुवात केली असता मृतक व त्याचे नातेवाईकांमध्ये आर्थिक देवाण घेवाणीचा जुना वाद असल्याची प्राथमीक माहीती मिळाली. आरोपी नामे नामदेव गणपत तळवेकर वय 50 वर्षे रा वाघोली ता हिंगणघाट ह मु देवळी, प्रेम नामदेव तळवेकर वय 20 वर्ष रा वाघोली ह मु देवळी, शंतनु धर्मपाल मून वय 20 वर्ष रा दुर्गवाडा भिडी, अनिकेत भिमराव मडावी वय 20 वर्ष रा देवळी, साहिल वासुदेव तळवेकर वय 19 वर्षे रा वाघोली, हिंगणघाट, मिथुन नारायण चीकराम वय 18 वर्षे रा दुर्गवाडा देवळी, अमर बाबाराव मून वय 19 वर्षे रा दुर्गवाडा,  यांना अटक केली असता नमुद माहीतीवरुन आरोपी नामे नामदेव तळवेकर, प्रेम तळवेकर या संशईतांना ताब्यात घेवुन घटने बाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली देऊन सदरचा गुन्हा हा आरोपी नामे शंतनु मून यांचे माध्यमातुन मृतकाचा खुन करण्यासाठी १,३०,००० रु. ची सुपारी आरोपी नामे मिथुन चिकराम व अमर मुन यांना देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
आज पावेतो झालेल्या तपासावरुन वरील नमुद आरोपीतांनी संगणमत करुन पैशाच्या मोबदल्यात सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील अटक आरोपीतांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली असुन या गुन्ह्याचा पुढील तपास श्री. तिरुपती राणे, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी देवळी करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक  यशवंत सोळंके, उप विभागीय पोलीस अधिकारी पुलगाव गोकुळसिंग पाटील, पोलीस निरीक्षक स्थागुशा वर्धा  संजय गायकवाड, सपोनि. तिरुपती राणे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी देवळी, महेन्द्र इंगळे, पोउपनि. गोपाल ढोले, सौरभ घरडे, पोलीस अंमलदार अशोक साबळे, गजानन लामसे, स्वप्नील भारव्दाज, संतोष दरगुडे, नरेन्द्र डहाके, निरंजन वरभे व पथक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तसेच सायबर शाखा वर्धा यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button