चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

सावंगी मेघे येथील गंभीर खुनाच्या गुन्ह्याचा झाला उलगडा

गुन्ह्यात तीन आरोपी ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मृतक वसंत चोखोबाजी हातमोडे, वय ६५ वर्ष, रा. पालोती हे दिनांक ०५-१०-२०२१ रोजी सकाळी ०९-०० वा. कामानिमित्त घरून निघून गेला असता तो घरी परत आला नाही. दिनांक ११-१०-२०२१ रोजी मृतक याचे प्रेत रोठा तलावालगतचे गेज चेंबर विहिरीमध्ये सिमेंट पोल ला बांधून संशयास्पदरित्या मिळून आल्याने फिर्यादी निलेश वसंतराव हातमोडे, वय २८ वर्षे रा पालोती जिल्हा वर्धा यांचे तोंडी रिपोर्टवरून अज्ञात आरोपींविरुद्ध नमूद कलमान्वये सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचा पोलीस स्टेशन सावंगी व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा कडून समांतर तपास करीत असताना मृतकाचा मुलगा व मृतकाची पत्नी यांनी दिलेल्या जबाबात नमूद आरोपीतांनी जुन्या आर्थिक कारणावरून आणि कोर्ट केस वरून मय्यताचा खून केल्याचा संशय व्यक्त केला होता.


त्यानंतर संशयीत अरोपीतांना चौकशी कामी ताब्यात घेतल्यावर चौकशी दरम्यान आरोपीतांनी, मृतक व आरोपी क्रमांक १ हे पो स्टे पुलगाव येथील दाखल अप. क्र. ५७०/२०१९ कलम ४२० अन्वये दाखल गुन्हा मधील अपहार करण्यात आलेल्या रकमेची मागणी मृतक हा आरोपी क्र. १ कडे वारंवार करीत असल्याने आरोपी क्रमांक १ यांनी इतर आरोपीतांचे मदतीने मृतक याचा खून करून त्याचे प्रेत रोठा शिवारातील तलावा लगतचे गेज चेंबर विहिरीत सिमेंट पोल ला बांधून पाण्यात पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने टाकून दिल्याची माहिती दिली. आरोपी भास्कर दादाराव इथापे वय ५९ वर्षे रा सिंधी मेघे वार्ड नंबर ३, वर्धा  विलास मून, वय वर्ष ५५, रा. वर्धा,  दिलीप नारायण लोखंडे वय ६१ वर्ष, रा. नागठाणा, वर्धा, आरोपी अटक दि. – १३/१०/२०२१ चे ०१.०० चे दरम्यान अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचे तपासात अटक आरोपितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून आज पावेतो झालेल्या तपासात पुराव्याच्या अनुषंगाने महत्वाच्या बाबी मिळून आल्या आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा पियुष जगताप यांचेकडे देण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा  पियुष जगताप, पोलीस स्टेशन सावंगी प्रभारी अधिकारी बाबासाहेब थोरात व पोलीस स्टेशन सावंगी येथील डी.बी. पथक व कार्यरत अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पो.नि.  गायकवाड, सपोनि. महेंद्र इंगळे, पोउपनी सौरभ घरडे, पोउपनि. गोपाल ढोले व स्थानिक गुन्हे शाखेच्या त्यांच्या पथकांनी व सायबर शाखा वर्धा यांनी संयुक्तपणे पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button