चांदाब्लास्ट विशेष

भरधाव ट्रकने बैलबंडी ला चिरडले – 2 इसमांसह बैल जागीच ठार

ट्रकचालक पसार शोध सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी 

मुन्ना खेडकर बल्लारपूर

बल्लारपूर तालुक्यातील बल्लारपूर ते आल्लापल्ली रोड वरील कळमना गावात एका भरधाव ट्रक ने बैल बंडी ला जोरदार धडक दिल्याने दोन व्यक्ती व एक बैल जागेवरच मरण पावले. 

आज दिनांक 13 रोजी सकाळी 8 च्या दरम्यान शेतीचे कामे करण्याकरिता आपली बैल बंडी घेऊन शेता कडे निघाले असता मेन रोड वर येताच भरधाव ट्रक ने धडक दिली. गावातल्या नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी दंगा नियंत्रण ची गाडी पाचारण केली आहे.


मृतक मध्ये दुधतोळे, काळे, आणि एक बैल जाग्यावरच मरण पावल्या ची माहिती मिळाली आहे. ट्रक चालक जोरदार धडक देऊन पसार झाला आहे पोलिस ट्रक चालकाचा शोध घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button