चांदाब्लास्ट विशेष

. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा वरोरा व भद्रावती तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रम

रवि शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

चांदा ब्लास्ट:

अतुल कोल्हे भद्रावती :-
दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रविंद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त दि. १३ ऑक्टोबर २०२१ रोज बुधवारला विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन वरोरा व भद्रावती तालुक्यात स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने रवि शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येत आहे.
यामधे भद्रावती-वरोरा तालुक्यातील कर्करोगग्रस्त रूग्णांना ट्रस्टच्या वतीने आर्थीक सहकार्य करण्यात येणार आहे. सकाळी दोन्ही तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येईल. त्यानंतर घोडपेठ ग्रा.पं. अंतर्गत जेष्ठ विधिज्ञ पुरुषोत्तम सातपुते यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण, अभ्यासिकेचे उद्घाटन व कोरोना योध्दा डेरा आंदोलनाचे शिलेदार पप्पु देशमुख यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. सोबतच भद्रावती शहरातील पी.एचडी. करीत असलेल्या एका गरीब विद्यार्थीनीला लॅपटॉप भेट देण्यात येणार आहे. त्यानंतर नंदोरी येथील अभ्यासिकेचे उद्घाटन तथा अभ्यासिकेला पुस्तक भेट करण्यात येईल. वरोरा येथील युपीएससी सिव्हील सेवा परीक्षा उत्तीर्ण इंजी. आदित्य जिवने यांचा जाहीर सत्कार ट्रस्टच्या वतीने होणार आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधुन कोरोनाने मृत झालेल्या व शेतकरी-शेतमजुर गरीब-गरजु पालकांच्या मुला-मुलींच्या निशुल्क विवाह नोंदणी अभियानाचा ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या शुभहस्ते वरोरा तालुक्यातून शुभारंभ करण्यात येत आहे.
यासर्व उपक्रमात ॲड. पुरुषोत्तम एम. सातपुते, ॲड. विजय मोगरे, डॉ. विजय देवतळे, ॲड. राजरत्न पथाडे, दत्ताभाऊ बोरेकर, खेमराज कुरेकर, बापुराव नन्नावरे, भास्करभाऊ ताजने, शंभुनाथ वरघणे, वसंताभाऊ मानकर, बाळासाहेब पडवे, बंडुभाऊ नन्नावरे, तुळशिराम श्रीरामे, आशीष ठाकरे, विजय मोकाशी, दिलीप टीपले, दामोधर रुयारकर, बाळू भोयर, घोडपेठ सरपंच अनिल खडके, उपसरपंच प्रदिप देवगळे, ग्रा.पं. सदस्य ईश्वर निखाडे, सौ. ज्योती मोरे, देवा शंकावार, केशव लांजेवार व ईतर ग्रा.पं. सदस्य आदींचा सहभाग असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button