चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

ग्रामपंचायत म्हातारदेवीच्या सरपंचपदी संध्या पाटील यांची निवड

घुग्घुस काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष रेड्डी यांनी केले नवयुक्त सरपंचाचे स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुरेश खडसे

जवळच्या ग्रामपंचायत म्हातारदेवी ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाने नऊ पैकी सात सदस्य निवडून बहुमत घेतले आहे.माजी सरपंच सौ. प्रिया गोहणे यांनी काही कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ग्रामपंचायत म्हातारदेवी येथे नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, ग्रामसेवक राजेश उगले यांच्या उपस्थितीत सौ.संध्या रवींद्र पाटील यांची सरपंचपदी निवड करण्यात आली.याप्रसंगी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच यांचे घुग्घुस काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.यावेळी
ग्रामपंचायत उपसरपंच शंकर उईके,ग्रामपंचायत सदस्य संजय टिपले,सौ.अस्मिता पाझारे,सौ.प्रिया गोहणे,सौ.मंगला देहारकर,संदीप चांभारे,माजी सरपंच दीपक सावे, बबन सावे,सिद्धार्थ बोरकर, अमोल आत्राम, सरिता टिपले,सचिन मांढवकर,सचिन सावे,गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष जगन्नाथ चटप व मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button