ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट माणिकगड तर्फे शालेय बॅग वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शिक्षा ही मानवाला समाजात आपले स्थान निर्माण करण्यास मदत करत असते. पहाडावरील गावातील मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे त्या करीत रोज शाळेत जावे या करिता,अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ नि जिवती तालुक्यातील पहाडावरील पल्लेझरी, माथाडी व मरकागोंदि गावातील जिल्हा परिषद शाळेतील एकूण 206 विध्यार्थ्यांना शालेय बॅग वितरित केल्यात.

बॅग वितरणाचा शुभारंभ माणिकगड चे ई. आर . हेड श्री नवीन कौशिक यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तर या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, शाळा समिती अध्यक्ष, ग्राम पंचायत सदस्य, मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक व गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

शालेय बॅग वाटपामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तर शिक्षक व नागरिकांनी अल्ट्राटेक,माणिकगड चे आभार मानत माणिकगडणे कंपनी पासून दूर वसलेल्या गावातील मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले ही आमच्या करिता आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन केलेत. तसेच या बॅग वाटपामुळे आमची मुले शाळेत रोज जाणार व त्यांना शिक्षणाची आवड निर्माण होईल असे सुद्धा गावाकऱ्यांनी व शिक्षकांनि सांगितले.

या उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता माणिकगड सी.एस.आर. टीम ने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये