ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहनांचे सर्व कागदपत्र वैध करावे – स्कुलबस/स्कुल व्हॅन वाहन धारकांना आवाहन

अन्यथा वाहनांचे कागदपत्रे वैध नसल्यास होणार दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सर्व स्कुलबस / स्कुल व्हॅन वाहन धारकांना आवाहन करण्यात येते की, ज्या स्कुलबस / स्कुल व्हॅन चा परवाना, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, कर, वायु प्रदुषण प्रमाण पत्र वैध नसेल तर त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा येथे आपल्या वाहनांची तपासणी करुन वाहनांचे सर्व कागदपत्र वैध करण्यात यावे. अन्यथा वाहनांचे कागदपत्रे वैध नसेल तर पुढील प्रमाणे दंड आकारण्यात येतो.

कागदपत्रे  –  आकारलेला दंड

१. परवाना  –  १०,०००/-

२. योग्यता प्रमाण पत्र  –  ९०००/-

३. विमा प्रमाणपत्र  –  ४०००/-

४. वायु प्रदुषण प्रमाणपत्र  –  ४०००/-

५. लायसन्स –  ११०००/-

६. बॅज – ४०००/-

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा तर्फे दिनांक ०१/०७/२०२३ ते ३१/०७/२०२३ या कालावधीत स्कुलबस वाहनांची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या स्कुलबस / स्कुल व्हॅन तपासणी मोहीमेव्दारा दिनांक १/०७/२०२३ ते २४/०७/२०२३ या कालावधीत केलेल्या कार्यवाहीचा तपसील खालील प्रमाणे आहे.

तपासलेली वाहने ५१, दोषी वाहने – २८, अटकावून ठेवलेली वाहने – ०५, निकाली वाहने – ०५, एकूण दंड – ९८,०००/-

                          (मो. समीर मो. याकुब )

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, (अ.का)

               वर्धा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये