ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रगौरव डॉ. आंबेडकर व चक्रवर्ती अशोक जन्मोत्सव

चांदा ब्लास्ट

आधुनिक भारताच्या निर्मितीचे रचनाकार राष्ट्रगौरवपूत्र डॉ. बाबासोब आंबेडकर यांचे 133 व्या जन्मदिवसाप्रित्यर्थ तथा भारताच्या ऐतिहासिक सुवर्ण युगाचे निर्मिक प्रजाहितदक्षी लोककल्याणमित्र प्रियदर्शी राजे अशोक मौर्य यांचे 2328 व्या जन्मदिवसाप्रित्यर्थ चंद्रपूर जवळील दुर्गापूर येथे चैत्र पूर्णिमेला संयुक्त जन्मोत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

जन्मोत्सवामध्ये गौरवशाली भारत देशाच्या या दोन ऐतिहासिक युगंधराच्या लोककल्याणकारी कार्याला प्रकाशित करणाऱ्या प्रबोधनाचा उत्सव संपन्न होणार आहे. सदर जन्मोत्सव धम्मदायाद मेत्ता संघ दुर्गापूर तथा धम्म प्रसार समिती दुर्गापूर च्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या चैत्र पूर्णिमा दिनी अर्था मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी दुर्गापूर येथील प्रसिध्द हर्षल कानव्हेंट स्कूल येथे सायण्ह प्रहरी 7.00 वा. प्रारंभ होईल. समारंभाला मुख्य अतिथी तथा प्रवक्ते म्हणून चंद्रपूरचे मा. डॉ. प्रा. टी.डी. कोसे सर लाभले आहेत.

सदर जन्मोत्सवात, 1) “माझा जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा बुध्दाचा जन्मदिवस मोठयाप्रमाणात साजरा करावा.” बाबासाहेबांच्या या आवाहनाच्या परीपूर्तते संबधात आजच्या बौध्द समाजाची चिकित्सा. 2) देवानांपिय पियदस्सी अशोकाच्या प्रजाहित दक्षी कल्याण कार्याची विशेषता. 3) भारतीय हृयातील राजा सम्राट अशोक! 4) अशोककालीन धम्म परिषदेची ऐतिहासिक पार्श्वभूमि या महत्त्वपूर्ण विषयांवरील विचारांद्वारे बोधन करण्यात येईल.

यास्तव दुर्गापूर तथा चंद्रपूर परिसरातील बहुसंख्य बांधवांनी या संयुक्त जन्मत्सवाचे प्रबोधन उत्सवात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे धम्मसिक्खपदं सन्डे स्कूलच्या संगीता मानकर, कविता नळे, छाया वालदे व अस्मिता वानखेडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकांद्वारे निवेदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये