ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध गोवंश होणारी वाहतूक पोलिसांनी थांबविली

३५ जनावरे बाराचाकी ट्रॅकसह एकूण १५ लाख ५० हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

दिनांक 03/12/23 रोजी गडचिरोली दिशेकडून मुल कडे एका ट्रक मधून रात्री12:00 वाजता दरम्यान अवैध गोवंश वाहतूक होणार अशी गोपनीय माहिती मिळाली असता सापळा रचून संशयित ट्रक MH 40 CM 2614 थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये 35 गोवंश जनावरे क्रूरपणे तोंडाला मोरके व दोर बांधलेले दिसून आले.

सदरची जनावरे गोशालेत दाखल करण्यात आले.मिळून आलेले 35 जनावरे व बारा चाकी टाटा ट्रक किंमत असे मिळून एकूण 15,50,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींवर शेख जाकीर शेख मेहबूब इर्शाद उल्लाह खान किस्मत उल्ला खान दोन्ही रा.मुर्तीजापुर जिल्हा अकोला, मोहसीन अली मोबीन अली रा.आकोट जिल्हा अकोला यांचेवर संबंधित विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा पोलिस अधीक्षक श्री रवींद्र सिंग परदेशी साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू मॅडम यांचे मार्गद्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांचे नेतृत्वात सावली पो स्टे चे हेड कॉन्स्टेबल विशाल दुर्योधन, रामदास कोंडबत्तूवार, संजय शुक्ला, पो शि चंदू गंपलवार, विजय कोटणाके यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये