चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

काँग्रेसच्या ऑनलाइन घरगुती गणेश उत्सव स्पर्धेचे आज बक्षीस वितरण

खा. धानोरकर यांची राहणार उपस्थिती ; शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ऑनलाइन घरगुती गणेश उत्सव स्पर्धेचे  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी (ता. २) सकाळी ११.३० वाजता कस्तुरबा चौकातील चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
या स्पर्धेत पहिले पारितोषिक कार्तिक नंदुरकर, दुसरे पारितोषिक एकता पित्तुलवार, तिसरे पारितोषिक सुभाष लांजेकर, चौथे पारितोषिक प्रणय विटेकर, पाचवे पारितोषिक समीर राखुंडे, तर प्रोत्साहनपर बक्षीस प्रज्वल गर्गेलवार, आकाश  गुंडावार, मंगेश अलोने, चैतन्य ठाकरे, कोमल चांडक, पवन लोनगाडगे, ऐश्वर्या आक्केवार, रोशनी गहुकार, हर्षाली बोकडे, रामदास आक्केवार, दीपक गौरकर, श्रीधर बुरिले, किशोर माणुसमारे, नितेश ठाकरे, मनोज बल्की, युगंधरा मडपुरवार यांना देण्यात येणार आहे. 
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या स्पर्धेत अनेकांनी सहभाग नोंदवित चंद्रपूर महानारातील रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता, महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी समस्या या विषयांवर आधारित देखावे, पर्यावरणपूरक, कोरोना जनजागृती बाबतचे देखावे सादर केले होते. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ११ हजार १११ रुपये, द्वितीय बक्षीस ७ हजार ७७७ रुपये, तृतीय बक्षीस ५ हजार ५५५ रुपये, चतुर्थ बक्षीस ३ हजार ३३३ रुपये, पाचवे बक्षीस २ हजार २२२ रुपये यासह प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात येणार आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button