जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, वर्धा यांची कुख्यात गुंड विरुध्द बेधडक मोहीम
पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) येथील कुख्यात गुंडाची एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) हद्दीतील ईतवारा बाजार, वर्धा ता. जि. वर्धा परीसरातील कुख्यात गुंड नामे विकास सुरज पांडे , वय ३१ वर्ष राह. इतवारा बाजार, वर्धा ता. जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) चे अभिलेखावर शरीराविरुध्द, हत्यार कायदा अंतर्गत सन २०२० पासून एकुण ०८ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये प्राणघातक शस्त्र सोबत बाळगणे, शस्त्रासह शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देवुन दुखापत करणे, साथीदारासह गृह आगळीक करुन खंडणी मागुन व अश्लिल शिवीगाळ करुन गंभीर दुखापत करणे, अडवणुक करुन हल्लाकरुन व दुखापत करुन नुकसान करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन शस्वासह खुनाचा प्रयत्न करणे (सदर गुन्हयात MCOCA अन्वये कलम वाढ करुन मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आलेले आहे.) गैरकायद्याची मंडळी जमवुन गृह आगळीक करुन दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन शस्त्रासह दगडफेक करुन नुकसान करणे, गृह आगळीक करुन दुखापत करुन शिवीगाळ करणे व मारण्याची धमकी देणे, परीसरात दहशत निर्माण करणे, सार्वजनीक शांतता भंग करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. तो सतत गुन्हे करण्याच्या सवर्डचा गुन्हेगार आहे. त्या पैकी संपुर्ण ०८ गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. मागील ०६ वर्षा पासुन स्थानबध्द ईसम नामे विकास सुरज पांडे, वय ३१ वर्ष राह. इतवारा बाजार, वर्धा ता. जि. वर्धा हा परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. विकास सुरज पांडे, वय ३१ वर्ष राह. इतवारा बाजार, वर्धा ता. जि. वर्धा याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने त्याचेविरुध्द कलम १२९ (ई) भारतीय नागरी सुरक्षा संहीता अंतर्गत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने ठाणेदार वर्धा (शहर) यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्यये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. वान्मथी सी.. जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांना सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने सादर केला होता. सदरहु स्थानबध्द गुंड प्रवृत्तीचा आणि सातत्याने करीत असलेल्या गुन्ह्यांची मा. वान्मथी सी. जिल्हादंडाधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेवुन विकास सुरज पांडे, वय ३१ वर्ष राह. इतवारा बाजार, वर्धा ता. जि. वर्धा याचे विरुध्द दिनांक १६.१०.२०२५ रोजी स्थानबध्द आदेश जारी केल्याने त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
मागील 1 वर्षातील कालावधीमध्ये पोलीस विभाग व महसुल विभाग यांचेमधील योग्य समंन्वयामुळे एम.पी.डी.ए. कायद्यान्वये धडक कार्यवाही करण्यात आलेली आहे. वर्धा जिल्ह्यातील अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता प्रवटा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर, तसेच रेती माफीया अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मनामध्ये धडकी भरलेली असुन गुन्हेगारी विश्वात पुढचा नंबर कुणाचा लागेल या भितीने चांगलीच दहशत निर्माण झालेली असुन गुन्हेगारांमध्ये चर्चा रंगत असल्याचे दिसुन येते.
आगामी येणारे सण उत्सव शांतता पूर्ण वातावरणात पार पाडण्याचे उददेशाने अशा अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर, तसेच रेती माफीया यांचेवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी.. तसेच मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल, यांनी दिलेले आहेत.
सन २०२५ मध्ये एकुण १८ दारु विक्रते, गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर तसेच रेती माफीया यांचेवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत जेल मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. तसेच सन २०२६ मध्ये आज पावेतो ११ गुंड प्रवृत्तीचे व समाजास घातक असलेल्या गुन्हेगांराबर कार्यवाही करण्यात आलेली आहे. अवैध दारु विक्रेते, गुंड प्रवृत्तीच्या घोकादायक व्यक्ती व रेती माफीयांवर कठोर कार्यवाही करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिलेले आहे. मा. जिल्हाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे बेधडक मोहीमेमुळे अवैध दारु विक्रेते, गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती तसेच रेती माफीया मध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा श्री. सुनिल महाडीक, उप विभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, पोनी/विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शना खाली पोहवा/अमोल आत्राम, पोहवा आशिष महेशगौरी, नेमणुक -स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि./नागेशकुमार चतरकर, पोउपनि / शरद गायकवाड, मपोहवा/वैशाली करमनकर, मपोशि/करिश्मा परचाके पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) यांनी केली आहे. दिनांक – १७-१०-२०२६



