ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रयाग येथे शाही स्नान ला गेलेल्या प्रा. सुरेश परसावार यांचे हृदयविकाराने निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
प्रयाग येथे शाही स्नान साठी महाकुंभ मिळत गेलेले श्रीराम भक्त व लोकमान्य विद्यालयातील सेवानिवृत्त उपप्राचार्य,श्रीराम जन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक,विश्व हिंदू परिषदेचे अग्रणी कार्यकर्ते, धर्माचार्य संपर्क विदर्भ प्रांत प्रमुख तथा स्थानिक गोरक्षण समितीचे पदाधिकारी सुरेश यादवराव परसावार यांचे दि.२९ जानेवारीला प्रयाग येथे महाकुंभ मेळ्यात हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ६२ वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,जावई,नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर दि.३० जानेवारीला स्थानीय पिंडोनी स्मशानभूमीत अंतिम संस्कार पार पडणार आहे.