ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रादेशिक वाहतूक विभाग पथकाने दोन अतिरिक्त भार वाहतूक करणारे ट्रक केले जप्त

गेल्या काही दिवसापासून वाहतूक विभागाची कार्यवाही होत असल्याने अवैध आणि अतिरिक्त भार वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणानले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात वाहतूक विभाग निरीक्षक कसंबे यांनी अतिरिक्त भार वाहतूक करणारे गिट्टी भरलेले ट्रक जप्त करून नागभीड पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेले आहे. प्राप्त माहिती नुसार वाहन क्रमांक एम एच ४९ऐ टी ९८५५व एम एच ४०सि एम ०७५५हे दोन्ही वाहने शोभानील मालकीचे असून अतिरिक्त भार वाहून नेत असताना वाहतूक पोलीस निरीक्षक कसंबे यांनी तपासणी केली असता जास्त भार वाहतूक करीत असल्याने प्रादेशिक वाहतूक विभाग कायज्ञान्वये जप्त करून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसापासून प्रादेशिक वाहतूक विभागाची कार्यवाही होत असल्याने अवैध आणि अतिरिक्त भार वाहतूक करणाऱ्याचे धाबे दनानले आहे. याकरिता नागभीड पोलीस त्यांना सहकार्य करण्याचे पोलीस स्टेशन नागभीड चे ठाणेदार मदत करण्यात येईल असे सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये