ताज्या घडामोडी

राज गोंडवाना गड संरक्षण समितीतर्फे आदिवासींच्या हक्कासाठी राजुरा येथे प्रदर्शन

तहसिलदार ओमप्रकाश गोंड ह्यांनी प्रदर्शनकर्त्यांची भेट घेऊन स्वीकारले निवेदन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राज गोंडवाना गड संरक्षण समिती व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने आदिवासींच्या हक्कासाठी राजुरा येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनात जिवती, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी या तालुक्यातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती ते पंचायत समिती पर्यंत आदिवासी बांधवांनी मोर्चा काढून आपल्या मागण्या मांडल्या.

राजुरा विधानसभा क्षेत्र आदिवासी प्रवर्गासाठी राखीव करावे, धनगर जातीला आदिवासी जमाती मध्ये समाविष्ट करू नये, पेसा क्षेत्रातील सरळ सेवा भरतीची अंमलबजावणी करण्यात यावी, लंकापती राजे रावण यांच्या दहनाची प्रथा बंद करण्यात यावी, कंत्राटी भरती रद्द करण्यात यावी, वयोवृद्ध नागरिकांना देत असलेलेल्या पेन्शन साठी ६५ वर्षाची अट रद्द करून ६० वर्ष करण्यात यावे, प्रत्येक तालुक्यात आदिवासी भवन उभारण्यात यावे, खाजगी आश्रम शाळा बंद करण्यात याव्या, गोंडवाना विदर्भ राज्य वेगळे करण्यात यावे, शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा, आदिवासी अतिक्रमण धारकांना पट्टे देण्यात यावे, आरक्षणाप्रमाणे आदिवासींची नोकर भरती घेण्यात यावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन राजुरा तहसिलदार ओमप्रकाश गोंड यांना निवेदन देण्यात आले.

आदिवासी नेते महिपाल मडावी, बाबुराव सलाम, किसन कोटनाके, शामराव सलाम यांनी शांतीपूर्ण प्रदर्शन मोर्चाचे नेतृत्व केले तर सदाशिव तलांडे, अनिल सिडाम, महेंद्र कुमरे, बंडू कन्नाके, तानाजी उईके, राजू मडावी, जोगेश्वर आडे, मलकू कोटनाके, शामराव कोटनाके, विनोद गेडाम, अंकिता मडावी, रवी आत्राम, संतोष मडावी यासह इत्यादींनी प्रदर्शन यशस्वी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये