ताज्या घडामोडी

शिवाजी मोघेचा निषेध करण्यासाठी माना जमातीचा मोर्चा धडकला तहसील कार्यालयावर

चांदा ब्लास्ट :सुधाकर श्री रामे

नागपूर येथे कविवर्य सुरेश भट सभागृहात १८सप्टेंबर रोजी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस साजरा केला जात असताना काँग्रसंचे शिवाजी मोघे यांनी आपल्या भाषणात माना जमाती बाबत आक्षेपार्य विधान केल्याने नागभीड तालुक्यातील हजारो बांधवानी मोर्चा काढून निवेदन देत निषेध केला आहे
माना जमात मंडळ, विद्यार्थी संघटना व माना फौंडेशन चे वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माना समाजाला घटना कलम ३४२अन्वये अनुसूचित जमातीच्या सोई सवलती मिळतात. त्यातच माना जमात मंडळ मुंबई यांनी मा उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी माना समाजाला आदिवासी म्हणून सोई व सवलती देण्यात येतात. न्यायालय यांनी दिलेला निर्णय शिवाजी मोघे यांनी आवमान आणि घटना बाह्य बोलून आमचे सरकार आले तर मा ना जमातीला स्वतंत्र आयोग नेमून काढून टाकू असे बोललेले आहे. याचा निषेध करण्यासाठी नागभीड तालुक्यातील माना जमात बांधव रस्त्यावर उतरून शिवाजी मोघे यांचा निषेध व्यक्त करीत हजारोच्या संख्येने मोर्चा काढून निषेध व्यक्त करीत तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी माना जमातीचे समन्वयक चौधरी, समाज चळवळीचे तरुण नेते अरविंद सादेकर, चिमूर येथील प्रा दिनकर चौधरी, सिंदेवाही येथील भरडे, नागभीड येथील मा नगराध्यक्ष उमाजी हिरे, वामन सावसाकडे, विद्यार्थी संघटनेचे दडमल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस प्रशासने सहकार्य करीततहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवाजी मोघे यांचे विरोधात नागभीड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये