ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात ग्राहक संरक्षण कायद्यावर मार्गदर्शन

कुठल्याही वस्तू स्थानिक दुकानातून घ्या! ऑनलाईन खरेदी करू नका : वामन नामपल्लीवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर स्वर्गीय मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय, चोरा येथे सुरू असून दुसऱ्या दिवशीच्या बौद्धिक सत्रात ग्राहक संरक्षण कायदा या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एन.व्ही. हरणे तसेच प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती येथील तालुका निरीक्षण अधिकारी, प्रवीण चीमूरकर, सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जि. चंद्रपूर, वामन नामपल्लीवार, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती, वसंत वर्हाटे, जिल्हा संघटक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपूर, पुरूषोत्तम मत्ते, मार्गदर्शक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा, चंद्रपूर तसेच राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र बेदरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलाने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या वेळी मार्गदर्शक वसंत वर्हाटे यांनी ग्राहक चळवळ ते ग्राहक संरक्षण कायद्यापर्यंतचा इतिहास सांगितला त्यात ग्राहक चळवळ ची सुरुवात ते ग्राहक पंचायत स्थापनेपर्यंतचा प्रवास तसेच ग्राहक पंचायत चे अधिकार व ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती दिली. तसेच प्रवीण चीमूरकर यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ आणि २०१९ मधील फरक, ग्राहकांचे अधिकार तसेच ई – कॉमर्स आणि डिजीट ट्रेड याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच ग्राहक पंचायती द्वारे तयार करण्यात आलेल्या कायद्यामुळे आपली फसवणुकीपासून संरक्षण होते असे आपले मत व्यक्त केले. तसेच वामन नामपल्लीवार यांनी विविध विभाग आणि ग्राहक तक्रारी याबद्दल मार्गदर्शन केले. कुठल्याही वस्तू स्थानिक दुकानातून घ्या, ऑनलाईन खरेदी करू नका असे आवाहन केले.

पुरूषोत्तम मत्ते यांनी गॅस, विज समस्या याबाबत बोलले तसेच त्यांनी ग्राहक म्हणून फसवणुक झाल्यास ग्राहक पंचायत कडे येऊन तक्रारी देण्याचे आवाहन केले. तसेच आपल्या देशात शोषणमुक्त अर्थव्यवस्था तयार व्हावी असे आपले मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एन. व्ही. हरणे यांनी ग्राहक कायदा आपल्या अनुभवातुन काय आहे आणि ग्राहकांसाठी किती मजबूत कायदा आहे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच सर्वांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर केला पाहिजे असे आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र बेदरे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर संदीप प्रधान यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अथक परिश्रम केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये