ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२५ फेब्रुवारीला हिरकणी सांस्कृतिक महोत्सव

संवाद प्रतिष्ठानचे आयोजन; विविध क्षेत्रातील महिलांचा केला जाणार सन्मान

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : संवाद प्रतिष्ठानच्या वतीने २५ फेब्रुवारीला हिरकणी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना स्त्री शक्ती सन्मान पुरस्काराचे सन्मानित केले जाणार आहे.

मागील वर्षीपासून संवाद प्रतिष्ठानच्या वतीने स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार वितरित करण्यात येत आहे. यात राजमाता जिजाऊ मातृ सन्मान पुरस्कार, माता रमाई समता पुरस्कार, सावित्रीमाई ज्ञानज्योती पुरस्कार, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सेवाव्रती पुरस्कार, राणी हिराई प्रेरणा पुरस्काराचा समावेश आहे. या सर्व पुरस्काराची घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रित येत संवाद प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या माध्यमातून समाजोपयोगी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यासोबतच महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हिरकणी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जात असल्याची माहिती संवाद प्रतिष्ठानच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये