ताज्या घडामोडी

सोन्या-चांदीचे दागिणे विकण्याच्या प्रयत्नातील घरफोड्यांना अटक – गुन्हे शाखेचे मोठे यश

चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात घरफोडी केल्याचे उघड

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर जिल्ह्यात घरफोडीचे अनेक गुन्हे घडले असुन त्यातील बहुतांश गुन्ह्यांची पोलीस विभागाने उकल केली नसल्याने अभिलेखावरील अशा गुन्ह्यांचा शोध घेऊन त्यांचा तपास पुर्ण करण्याचे व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्याचे आदेश चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

प्राप्त आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार ह्यांनी तपास पथकाचे गठण करून कारवाई सुरू केली. स्थागुशा चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार ह्यांच्या कुशल मार्गदर्शनात स्थापन पथकाने शहरात प्रभावी पेट्रोलींग करून घरफोडीचे गुन्हे उघड़किस आणण्याचे प्रयत्न सुरू केले तसेच आपल्या खबऱ्यांना सतर्क केले. दिनांक 23/08/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहीती वरून स्थागुशाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बल्लारशाह सापळा रचला असता त्यांना रेल्वे स्थानकावर दोन सराईत गुन्हेगार चोरीचे सोन्या-चांदीचे दागिणे, एलईडी टिव्ही विकण्याकरीता ग्राहक शोधत असल्याचे आढळुन आले.

स्थागुशा च्या पथकाने सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे वय 26 वर्षे रा. सोमनाथपूरा, राजुरा व मोईन उर्फ फैजान शरीफ शेख वय 18 वर्षे रा. कमला नगर वार्ड, वडसा देसाईगंज जि. गडचिरोली ह्या दोन संशयित आरोपींना शिताफीने जेरबंद करून चौकशी केली असता त्यांनी गोंडपिपरी, भद्रावती व वणी जि. यवतमाळ हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. दिलेल्या कबुली जबाबानंतर त्यांचेकडुन गुन्हयातील मुद्देमाल सोन्याचे व चांदीचे दागीने, नगदी रक्कम. एलईडी टिव्ही. असा एकूण 1,03,671 /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर दोन्ही सराईत घरफोड्यांवर गोंडपिपरी पोलीस ठाण्यात अप क्र. 153 / 21 भादंविच्या कलम 454, 380, भद्रावती पोलीस ठाणे अप क. 115/ 23 भादंविच्या कलम 457, 380, वणी जि. यवतमाळ पोलीस ठाणे अप क. .865 / 23 भादंविच्या कलम 457,380 अन्वये गुन्ह्यांची नोंद आहे. सदर कर्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु ह्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार ह्यांच्या कुशल नेतृत्वात सपोनी. नागेश कुमार चातारकर, पोहवा नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, मुजावर अली, पोशि मिलींद जांभुळे, सतिश बगमारे, नरेश डाहुले चापोशि रूपन बारसिंगे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये