ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एन.सी.सी. प्रवेश भरती संपन्न

यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात एन.सी.सी. युनिट सूरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वायगांव: स्थानिक यशवंत कनिष्ठ महाविद्यालयास सत्र 2023-24 पासून रक्षा मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेना हा सैन्य दलाचा उपक्रम सूरू करण्याची परवानगी मिळालेली असून यात 54 मुलांमुलींना सैनिकी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या सत्रात एन.सी.सी.च्या प्रथम वर्षांकरीता
16 मुले व 11 मुलींची निवड छात्र सैनिक म्हणून 25 ऑगस्ट रोजी एन.सी.सी. निवड समितीने केलेली आहे. उद्यापासून NCC चे सैनिकी प्रशिक्षण दर शनिवारी व रविवारी दिले जाणार आहे.

सदर निवड समितीत एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, 21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियनचे सुबेदार मेजर ग्यानी प्रसाद, सुबेदार पृथ्वीसिंग राठोड, हवालदार कुलदीप सिंग व हवालदार रामटेके या अधिकाऱ्यांनी कामकाज पाहिले.

केअर टेकर ऑफिसर म्हणून प्रा. विनोद मेंढे यांची निवड करण्यात आलेली आहे. एन.सी.सी.च्या प्रथम वर्ष प्रवेश भरतीकरिता 65 मुलामुलींनी भाग घेतला. यात 200 मी. दौड, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा व मुलाखतीचा समावेश होता.

यशस्वीतेकरीता प्रा. मंगेश भोमले, अंडर ऑफिसर अक्षय जबडे, मयुरी उईके, सार्जंट प्रतिक क्षीरसागर, शेखर भोगेकर व सौरभ साव यांनी अथक प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये